मुंबईतील वाकोला (धोबीघाट) येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेनं बंदी घातली आहे, अशी माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असा कुठलाही आदेश प्रशासनाने दिलेला नाही, असं स्पष्ट केलं. या केवळ अफवा आहेत. असं बोलताना त्यांनी ठाकरे गटावर आरोपही केला आहे. आता रितू तावडे यांनी केलेल्या आरोपाला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.














