Mns Kalyan: कल्याण पश्चिमेतील मल्हार नगर आणि जोशी बाग परिसरातील नाले कचरा आणि गाळाने तुंबल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन करत थेट नाल्यात उतरून क्रिकेट खेळत प्रशासनाचा निषेध नोंदवला.














