Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात भाषण करताना देशवासियांना आवाहन केलं. पेट्रोलियम उत्पादनांचा वापर कमी करा, सोने खरेदी टाळा, असं मोदी म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.











