Priyanka Chaturvedi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात भाषण करताना देशवासियांना आवाहन केलं. पेट्रोलियम उत्पादनांचा वापर कमी करा, सोने खरेदी टाळा, असं मोदी म्हणाले. मोदींच्या या आवाहनावर आता प्रियांका चतुर्वेदींनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

