बारामतीत पुन्हा एकदा विमानाचा अपघात झालेला आहे. बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात या प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला असून त्यातील शिकाऊ वैमानिक मात्र सुरक्षित आहे. रेड बर्ड कंपनीचं हे विमान असल्याची माहिती असून
अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. तर यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमानं या ठिकाणी कोसळलेली आहे. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं.








