बच्चू कडू, अंबादास दानवे यांच्यासह १० सदस्यांनी आज विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी शपथ घेताना मी माझं कर्तव्य निष्ठेपूर्वक पार पाडेन असं म्हणत मला थोडी सुविधा दिली पाहिजे, असं मिश्कीलपणे म्हटलं. त्यावर सभापतींनी लगेच नाही असं उत्तर देताच बच्चू कडूही हसले. तर यावेळी अंबादास दानवे यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थितांशी हस्तांदोलन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दानवेंच्या पाठिवर गंमतीशीरपणे थाप मारली.








