Nitin Gadkari: नागपुरात रविवारी जलसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी यांचे भाषण सुरू असतानाच गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी घोषणाबाजी केल्याने खळबळ उडाली. गडकरी यांनी गोसेखुर्दबाबत स्वतंत्रपणे चर्चा करू. या चर्चेसाठी हे योग्य व्यासपीठ नसल्याचे सांगितले. तरीदेखील घोषणा देणे सुरू होते. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय आला होता.


















