Maharashtra Weather Update: राज्यात सध्या हवामानात बदल होत असून काही भागात तीव्र उष्णता तर काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. वादळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, गुरुवारीही राज्यातील काही भागांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर बहुतांश भागात हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.










