Sanjay Raut: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार निशाणा साधला. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा संदर्भ देत राऊत यांनी थेट भारताच्या सरन्यायाधीशांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे फॉलोअर्स वाढले त्याला भारताचे सरन्यायाधीश कारणीभूत असून तेच या पार्टीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत,” अशी टीका त्यांनी केली.








