नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी (SP) आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि भास्कर भगरे यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका करत भाषण केलं आहे…







