Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींना वेग प्राप्त होताना दिसत असून यामुळे नागरिकांना घामाच्या धारा, तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत आहे. मान्सून राज्यात दाखल होण्यास अजून काही दिवसांचा अवधी आहे. मात्र, त्याआधी वादळी पावसामुळे कमाल तापमानात काहीशी घट होत असून वातावरणात काहीकाळ गारवा निर्माण होत आहे. दरम्यान, बुधवारीही राज्यातील काही भागांना हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.







