आफ्रिकेतील इबोलाच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे जगभरात या विषाणूचा प्रसार रोखण्याकरता मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे. भारतीयांनाही याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. असं असतानाच युगांडामधून भारतात आलेल्या २८ वर्षीय तरुणीला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही तरुणी २३ मे रोजी उतरली. तिला सध्या इंदिरानगर येथील साथरोग रुग्णलायात विलगीकरणात ठेवण्यात आलंय. पीटीआयचा हवाला देत टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.










