नाशिकमधल्या अशोक खरातचं प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं. महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी त्याला अटकही झाली. तसंच त्याने केलेले किळसवाणे प्रकारही समोर आले आहेत. या भोंदू अशोक खरातला कठोरातली कठोर शिक्षा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे. अशोक खरातला गुरु मानून त्याची पाद्यपूजा केल्याचे फोटो व्हायरल झाल्याने रुपाली चाकणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलं. रुपाली चाकणकर यांनीही समोर येऊन अशोक खरातशी कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचं म्हटलंय. आता हा विषय पुन्हा चर्चेत आलाय अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटामुळे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या चित्रपटात रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार आहेत. मात्र रुपाली चाकणकरांची भूमिका करु नका हे सांगून आपल्यावर राजकीय दबाव आणला जातोय असं आता दीपाली सय्यद यांनी म्हटलंय.
हे प्रकरण काय आहे? दीपाली सय्यद यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊ.












