Durgadi Killa:कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदनिमित्त नमाज पठणावेळी दुर्गादेवी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेशबंदी केली जाते, या मुद्द्यावरून शिवसेना आणि हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.गेल्या ४० वर्षांपासून बकरी ईदच्या दिवशी मंदिर प्रवेशासाठी घंटानाद आंदोलन करण्यात येत असून यंदा भाजपनेही आक्रमक भूमिका घेत मंदिरात प्रवेश न दिल्यास हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करण्याचा इशारा दिला होता. आज एकीकडे दुर्गाडी किल्ला परिसरातील ईदगाहवर मुस्लिम समाजाकडून नमाज पठण सुरू असताना दुसरीकडे लाल चौकी परिसरात शिवसेना शिंदे गट,ठाकरे गट तसेच हिंदूवादी संघटनांनी आंदोलन केले.आंदोलकांनी दुर्गाडी किल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना लाल चौकी परिसरातच रोखले.संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.








