राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. महायुती म्हणून सर्व १७ जागांवर निवडणूक लढवली जात असून अनिकेत तटकरे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, अनिकेत तटकरेंना विधान परिषद आणि भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद देणार अशी काही तडजोड झाली का? याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुनील तटकरेंनी त्यावर भाष्य केलं आहे.










