शहराध्यक्ष सुनील टिंगरे, विधानपरिषद उमेदवार विक्रम काकडे आणि खासदार पार्थ पवार यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत सुनील टिंगरे यांनी पार्थ पवार यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. तसंच पुढील काळात योग्य तो सन्मान राखला जाईल. तर पक्ष आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वासही टिंगरेंनी व्यक्त केला. दरम्यान, सुनील टिंगरे यांच्या नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.









