मुख्यमंत्री झाल्यानंतर जोसेफ विजय यांची ही पहिली जाहिर सभा… या सभेची चर्चा का होतेय तर निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विजय रस्त्यावर दिसले. रॅली काढली अन् लोकांमध्ये गेले. या सभेसाठी त्यांनी ठिकाण निवडलं ते त्रिची… याच त्रिची शहरातील त्रिची पुर्व या मतदारसंघातून विजय यांनी. तिरुचिरापल्ली पुर्व ज्याला त्रिची पुर्वही म्हटलं जात या मतदारसंघातून विजय यांनी २७ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यासोबतच पेरुम्बूर या मतदारसंघातही विजय जिंकले होते. त्यानंतर नियमानुसार विजय यांनी त्रिची मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी त्रिचीमध्ये येऊन मतदारांचे आभार मानले आणि त्रिशी शहर हे ह्रदयात आहे, असंही म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर काळा कोट का घातला, यावरही भाष्य केलं. आपले विचार हे स्पष्ट असावेत. यासाठी वेगवेगळे रंग न घातला, काळा आणि पांढरा हे दोनच रंग वापरणार असं सांगितलं.








