Ambadas Danve & Abdul Sattar: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना नेत्यांमध्ये नाराजी नाट्य, मत मतांतरं पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्या घडामोडी दरम्यान, दोन नेत्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत दानवे आणि सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. या २४ तास उलटत नाही तेच दोन्ही नेते आज गळा भेट घेतानाही दिसले.








