अमेरिकेतून सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर भाष्य करणारे अभिजित दीपके भारतात येण्याच्या तयारीत असून, त्यांनी प्रख्यात विधीज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात बोलताना असीम सरोदे यांनी, सरकार सध्या बदल्याच्या भावनेतून काम करत असल्यास दीपके यांनी भारतात येण्यापूर्वी गंभीर विचार करावा, असा सल्ला दिला आहे. संपूर्ण कायदेशीर नियोजन असेल तरच त्यांनी भारतात यावं, कारण विमानतळावरूनच त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. सध्या दीपके देशविघातक कृत्य करत आहेत असं एक ‘नॅरेटिव्ह’ जाणीवपूर्वक तयार केले गेले असून सरकार थेट घाई करणार नाही, मात्र त्यांच्या पाठीशी किती लोक उभे राहतात यावर पुढील भूमिका ठरेल, असं सरोदे म्हणाले.








