उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला थेट भेट दिली. यावेळी सुनेत्रा पवारांनी तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता, औषधांची उपलब्धता आणि एकूण व्यवस्थापन, या प्रत्येक गोष्टीची त्यांनी अत्यंत बारकाईने माहिती घेतली. यावेळी रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.








