Gokul Gite on Nashik MLC Election : नाशिकचे बंडखोर गोकुळ गिते माघार न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमवारी देखील गोकुळ गिते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा ओझर विमानतळावर गाडीतच संवाद झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र गीते यांची मनधरणी करण्यात अपयश आल्याची माहिती आहे. तर यासंदर्भात आज निर्णय होईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.











