Nana Patole: मुंबईच्या लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट-क्लास डब्यात दरवाजा बंद ठेवण्याच्या किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबई हादरली. अशातच नाना पटोले यांनी या घटनेबाब विधानसभेत बोलताना कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला.












