पत्रकारांशी झालेल्या वादानंतर शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. वादाच्या प्रसंगी अनवधानाने वापरलेल्या अपशब्दांबद्दल त्यांनी माध्यम प्रतिनिधींची माफी मागितली असून, राजकीय टीका स्वीकारू पण कुटुंबीयांना वादात ओढू नये, अशी भावनिक विनंती त्यांनी केली आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खेद व्यक्त केला. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सातत्याने आपल्यावर टीका आणि आरोप होत असल्याचं सांगत त्यांनी संबंधित घटनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.












