Sanjay Dina Patil: उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ते पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी देताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय दिना पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन दिलगिरी व्यक्त केली. सध्या राजकीय वर्तुळात ज्यांच्या नावाची चर्चा होत आहे, त्या संजय दिना पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत जाणून घेऊयात.












