Devendra Fadnavis: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवरील स्लॅब कोसळला असून, डोंगरावरून वाहणारे पाणी थेट बोगद्यात कोसळत आहे. तसेच काल मानखुर्द येथील जनता नगर परिसरात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास तीन मजली संरचना असलेले घर कोसळले. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. अशातच या सर्व दुर्घटनांवरुन आज विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. अशातच विरोधकांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.









