maharashtra weather update: राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून रविवारपासून अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढली आहे. काही भागात मागील चोवीस तासांत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारीही हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज राज्यातील कोणत्या भागांना ‘रेड अलर्ट’ तर कोणत्या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे? हे जाणून घेऊयात









