Sanjay Raut On Sharad Pawar And Eknath Shinde meet: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांच्या पक्षाची बैठक घेतली. तसेच या बैठकीनंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट देखील झाली. या भेटीचा फोटो एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.












