शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्या सूनेने गंभीर आरोप करत कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून विनायक राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.










