आज सोशल मीडियावर काही सेकंदांचा व्हिडिओ लाखो-कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतो. पण प्रत्येक व्हायरल व्हिडिओमागे एक माणूस असतो… आणि जेव्हा तो माणूस एक अल्पवयीन मूल असते, तेव्हा समाजाची जबाबदारी अनेक पटींनी वाढते. अलीकडे एका लहान मुलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर तिच्यावर आधारित मीम्स, रील्स, मुलाखती आणि विविध प्रकारचा कंटेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागला.










