mumbai pydhonie case मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एका वॉचमनने ७ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. रविवारी (१२ जुलै) पायधुनी भागातील एका इमारतीमध्ये ही घटना घडली. पीडित मुलगी इमारतीमधील प्रसाधनगृहात गेली असताना, आरोपी सुरक्षारक्षकाने ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. ही बातमी समोर येताच परिसरातील स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त झाले. नागरिकांनी तातडीने पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरू केली.









