राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, त्यांच्या पदाविरोधात आता पक्षाकडूनच आव्हान देण्यात आलं आहे. घटनेतील कलमाचा दुरुपयोग तसंच पक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रवातील एका जेष्ठ नेत्यानं थेट हे पाऊल उचल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. हे नेते कोण आहेत? त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे पाहू या.














