महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील,
नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. अशातच आता या सर्व चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागील कारण सांगितलं आहे.













