नीट पेपरफुटीप्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीकरता कॉकरोच जनता पार्टीने मोठं आंदोलन उभं केलं. या आंदोलनाला पाठिंबा द्यावा याकरता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे बेमुदत उपोषण करत आहेत. आजचा त्यांच्या उपोषणाचा १८ वा दिवस आहे. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून जवळपास साडेआठ किलो वजन कमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांनी हे उपोषण सोडून त्यांना सक्तीने अन्न दिलं जावं आणि वैद्यकीय मदत पुरवण्याबाबत न्यायालयाने आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली गेली आहे. यासाठी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.












