Maharashtra Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही भागात हलक्या सरींची नोंद होत असली तरीही बहुतांश भागात हवामान कोरडे आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी असून काही भागात कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होईल, असे हवामान विभागाने सांगितले.











