Farmers On Rain delay : आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक. लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघतात. मात्र यंदाची वारी अनेक शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरली. कारण अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतीचं गणितच बिघडलं आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली होती. मात्र अनेक जिल्ह्यांत पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या, तर ज्या ठिकाणी पेरणी झाली तिथेही उगवण धोक्यात आली. पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती सतावत आहे. परिणामी, वारीच्या काळातही अनेक शेतकरी शेतीच्या चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.










