Mumbai: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कधी कोणाला ट्रोल केलं जाईल, याचा नेम नाही. अनेकदा सोशल मीडियावर स्टंटबाजी करतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात. लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करताना दिसतात पण सोशल मीडियावर ‘दिसतं तसं नसतं. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला आहे. मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथील एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खवळलेल्या समुद्राच्या लाटांमध्ये थेट उडी मारताना दिसते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीला ‘स्टंटबाजी करू नकोस’, म्हणत चांगलंच ट्रोल केलं. पण या व्हिडिओचं सत्य मात्र वेगळेच आहे जे आता उघडकीस आले आहे.










