देशात सध्या एक ट्रेंड आहे, जर तुम्हाला एखाद्या पक्षात प्रवेश करायचा असेल. तर दोन तृतीयांश संख्याबळ जुळवा. चांगली डील मिळवा अन् कुठेही प्रवेश करा… महाराष्ट्रात तर असं गेल्या काही वर्षात तीनवेळा घडलंय. दोनवेळा शिंदेंनी केलंय तर एकवेळा अजितदादांनी… म्हणजे जिंकायचं एकाच्या नावाने अन् नंतर दुसऱ्याकडेच जायचं… देशात राजकीय फोडाफोडीचा सध्या हाच फॉर्म्युला सुरु आहे. आता थलपती विजयसुद्धा आमदार फोडण्याच्या तयारीत आहेत. पण राजकारणात नवे असलेल्या विजय यांनी आमदार फोडण्याची स्टाईल थोडी वेगळी आहे. त्यासाठी ऑपरेशन एल सुरु झालंय. पाहुयात तेच ऑपरेशन एल आणि विजय यांची स्टाईल काय आहे.










