सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून २१ दिवसांहून अधिक काळ उपोषण आंदोलन केलं आहे. शनिवारी त्यांना जंतर-मंतर या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. मात्र सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं नाही. आता उपोषण सोडण्यासाठी सोनम वांगचुक यांनी तीन अटी ठेवल्या आहेत. सरकारने तीन अटी मान्य केल्या तरच आपण उपोषण सोडू असं सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलं आहे.









