Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून २१ दिवसांहून अधिक काळ उपोषण आंदोलन केलं आहे. शनिवारी त्यांना जंतर-मंतर या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. मात्र सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं नाही. अशातच आता डॉक्टरांनी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आहे.











