काॅक्रोज जनता पार्टीने सोमवारी पुकारलेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं तरुण-तरुणी सहभागी झाले होते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दरम्यान, आजही हे आंदोलन कायम असून तरुणाई संसदेवर धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर जंतर मंतर या आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त कायम असून तणावाचं वातावरण आहे. आजही बॅरिकेड्स का लावले गेले? एन्ट्री पाॅईंट्स का बंद आहेत? याबद्दल अभिजीत दिपके यांनी पोलिसांना थेट जाब विचारला.










