शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सामना ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत तरुणाईने पुकारलेल्या आंदोलनावर सविस्तर भाष्य केलं. अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने एका काॅक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन उभं केलं आणि त्याची धग देशभरात पोहोचली. जे दिपकेंना जमलं ते विरोधी पक्षांना १२ वर्षांत
का जमलं नाही? यावर उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केलं आहे.













