नोकरी, पगारवाढ आणि गुंतवणुकीच्या दैनंदिन चर्चेत आपण ‘रिटायरमेंट’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. वाढती महागाई, वाढते आयुर्मान आणि बदलत्या कौटुंबिक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आज योग्य निवृत्ती नियोजन (Retirement Planning) ही पर्यायी गोष्ट नसून काळाची गरज बनली आहे.
तसेच, सध्याच्या तरुण पिढीमध्ये FIRE (Financial Independence, Retire Early) या संकल्पनेचे मोठे आकर्षण दिसून येत आहे. पण मग…
❓ निवृत्तीसाठी फक्त SIP पुरेशी असते का?
❓ योग्य रिटायरमेंट कॉर्पस कसा ठरवावा आणि 25X नियम किती व्यवहार्य आहे?
❓ आर्थिक गणितांसोबतच निवृत्तीची मानसिक तयारी कशी करावी?
या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व सविस्तर मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा!
















