Tukaram Mundhe: विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, मधुमेह आणि अयोग्य आहाराच्या सवयींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने शाळांमधील अन्नसुरक्षेबाबत मोठे पाऊल उचलले आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शाळेच्या आवारात किंवा शाळेपासून ५० मीटर परिसरात जंकफूडची विक्री, जाहिरात किंवा वितरण करता येणार नाही. त्याचबरोबर प्रत्येक शाळेला सुरक्षित, सकस आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली, असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.










