महाराष्ट्रात पावसानं पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे… राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय… विशेषतः विदर्भात पावसाचा जोर वाढल्यानं अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे… अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय… कुठे किती पाऊस पडतोय ? आणि काय परिस्थिती? पाहूया…












