पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठं आंदोलन झालं. यावेळी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकावर रोष व्यक्त करण्यात आला. काहींनी पोस्टर्समधून तर काहींनी घोषणांमधूनही टीका केली होती. हा मुद्दा संसदेत देखील गाजला. त्यावरून झेन जींच्या एकंदर वर्तनावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले
होते. भाजपाच्या खासदार कंगणा रणौत यांनी तर झेन जींना थेट गटर जनरेशन म्हणून संबोधलं होतं. ज्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं. संसदेतही हा मुद्दा चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आता याबाबत भाष्य केलं आहे. मोदींनी आपल्या सोशल मीडियावरवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आंदोलक मुलांनी वापरलेल्या भाषेबाबत चिंता व्यक्त करताना ही दिशा भरकटलेली मुलं असल्याचा उल्लेख केला आहे.










