मनसेच्या विद्यार्थी सेनेचा २०वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या व्यापक आंदोलनाविषयी भाष्य केलं. कोणाच्याही बाबतीत अशी खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये. पंतप्रधानांचं हे म्हणणं मला मान्य आहे. फक्त हे त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांना सांगावं, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.












