Abhijeet Dipke on Politics: नीट पेपरफुटी प्रकरणी जेन झीच्या आंदोलनाला पाठबळ देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मोठं यश मिळालं. सीजेपीमुळे देशात सरकारसमोर प्रेशर ग्रुप तयार झाला. आता हाच ग्रुप पुढे जाऊन राजकीय पक्ष बनणार का? या पक्षाकडून निवडणुका लढवल्या जाणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय. यावर कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आता खुलासा केला आहे.













