Rohit Pawar: काँग्रेसकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा होत आहे. बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअऱ करुन काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे. “सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील”, असं काँग्रेसने पोस्टमध्ये लिहिलं आहे. अशातच आता काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर रोहित पवार, उमेश पाटील आणि अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.








