शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी तथा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.












