Rahul Gandhi: नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळाला. नीट पेपरफुटीविरोधात संपूर्ण देशभरात मोठी आंदोलने झाली.
या आंदोलनांनंतर युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी, सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सोशल मीडियाचा वापर करताना दिसत आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी हे इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय ट्रेंडचा वापर करून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत.










